Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नॉट रिचेबल अजित पवार पुण्यातील कार्यक्रमात प्रकटले

नॉट रिचेबल अजित पवार पुण्यातील कार्यक्रमात प्रकटलेपुणे : खरा पंचनामा

तब्बल 17 तास नॉट रिचेबल झाल्यानंतर अखेर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार शनिवारी पुण्यात प्रकटले. एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनाला अजित पवार उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि अफवा पसरवणाऱ्यांचा खरपूस समाचार घेतला. मी कुठेही गेलो नव्हतो. मी इथेच होतो. तब्येत बरी नव्हती म्हणून औषधं घेऊन झोपलो होतो. पण मी कुठे आहे याची खात्री न करता अनेकांनी बातम्या चालवल्या. ते चुकीचं आहे, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी आपली तब्येत बरी नसल्यानेच आपण नॉट रिचेबल असल्याचं सांगून चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

कार्यक्रमाला निघालो असताना पित्ताचा त्रास व्हायला लागला. जागरणं जास्त झाली आणि दौरे जास्त झाले तर मला पित्ताचा त्रास होतो. हे आज नाही पहिल्यापासून आहे. मला कसं तरी व्हायला लागल्यानंतर मी जिजाईला जाऊन डॉक्टरांकडून गोळ्या घेतल्या आणि शांतपणे झोपी गेलो. मला इतकं वाईट वाटत होतं मीडिया काहीपण दाखवत होता. अजित पवार नॉट रिचेबल... हे बंद करा ना. तुम्ही आधी कन्फर्म करा. ते कुठे आहेत? काय आहेत ते पाहा. कारण नसताना एखाद्याची बदनामी नसताना किती बदनामी करायची? असा सवाल अजित पवार यांनी केला.

ठिक आहे तुम्हाला अधिकार आहे. आम्ही पब्लिक फिगर असल्याने तुम्हाला तशा प्रकारच्या बातम्या देण्याच्या. शेवटी आम्ही माणूस आहे. आज पेपर पाहिला तर ब्रॅकेट टाकून बातम्या आल्या. हे बरोबर नाही. खात्री करून बातम्या चालवल्या असत्या तर बरं झालं असतं, असा टोला अजित पवार यांनी लगावला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.