Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

समीर वानखेडे यांची 5 तास कसून चौकशी!

समीर वानखेडे यांची 5 तास कसून चौकशी! मुंबई : खरा पंचनामा 

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात 25 कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा आरोप असलेल्या आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांची आज पाच तासाहून अधिक काळ कसून चौकशी करण्यात आली. 

या सीबीआय चौकशीनंतर समीर वानखेडेंवर निलंबनाच्या कारवाईची शक्यता वर्तविण्यात येत आहे. समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी दिल्लीतून देखील सीबीआयची टीम दाखल झाली आहे. समीर वानखेडे सकाळी 10.15च्या सुमारास वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले. यानंतर दुपारी जेवणानंतरच्या सुटीनंतरही सुमारे पाच तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली. 

वानखेडेंची प्रॉपर्टी, महागड्या गाड्या आणि परदेश वाऱ्यांवरील खर्च यावर त्यांना प्रश्न विचारण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. आर्यन खान केसमधील वादग्रस्त घडामोडी, 50 लाख रुपये कथितरित्या स्वीकारल्याचा आरोप, ज्ञानेश्वर सिंह यांच्याशी वादग्रस्त संवाद आणि खुद्द एनसीबीच्या एसआयटीने सादर केलेला अहवाल या सगळ्यांवरून वानखेडेंवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात येते आहे. 

दरम्यान, आर्यन खानची चौकशी आणि अटके दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड केली होती का, याचाही तपास समीर वानखेडेंच्या चौकशीत सीबीआय करणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.