बारसुमध्ये दडपशाहीचा वरवंटा फिरवू देणार नाही : राजू शेट्टी
मुंबई : खरा पंचनामा
बारसु परिसरात मनाई आदेश असूनही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक, माजी खासदार राजू शेट्टी रत्नागिरीला जाणार आहेत. त्यांनी असेही म्हटले की, सरकार स्थानिकांवर दडपशाहीचा वरवंट फिरवून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करत आहे.
बारसू (राजापूर) येथे सुरू असलेल्या माती सर्वेक्षणाला होणारा विरोध पाहता तसेच १ मे या कामगार दिनाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी होणारी आंदोलने, ५ मे रोजी बौद्ध पौर्णिमा सण या अनुषंगाने किरकोळ कारणावरून कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी ११ मे पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. असे असतानासुद्धा राजू शेट्टी बारसूला जाणार आहेत.
राजू शेट्टी म्हणाले की, अनेक नेत्यांना रत्नागिरीमध्ये येण्यासाठी बंदी घातली आहे. मला देखील रत्नागिरीमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी तसेच बंदी हुकूम बजावण्यासाठी रत्नागिरी पोलीस शोधत आहेत. पण ज्या वेळी आम्हाला जायचं, त्यावेळी कुठलाही कायदा, कुठलीही बंदी आम्हाला अडवू शकत नाही आणि रत्नागिरीत गेल्यावरच तुम्हाला कळेल आम्ही तिथे पोहचलेलो आहोत. उद्योगपतीच्या सुपाऱ्या घेऊन अशा प्रकारे स्थानिकांवर दडपशाहीचा वरवंटा फिरवून जर सरकार प्रकल्प लादत असेल तर आम्ही तो होऊ देणार नाही, असेही राजू शेट्टी म्हणाले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.