Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पुन्हा महाभारत : जुगारात पत्नीलाच लावले डावावर; मित्राकडे जाण्यासाठी दबाव

पुन्हा महाभारत : जुगारात पत्नीलाच लावले डावावर; मित्राकडे जाण्यासाठी दबावमेरठ : खरा पंचनामा

उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये पुन्हा महाभारत घडले आहे. येथील एका व्यक्तीने जुगारात त्याच्या पत्नीला डावावर लावलं आणि या डावात तो हरला. त्यानंतर हा माणूस घरी जाऊन त्याच्या पत्नीला म्हणाला, 'मी तुला जुगारात हरलो, तू आता माझ्या मित्राकडे जा'. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

ही घटना मेरठमधल्या लिसाडी पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या पूर्व अहमदनगर परिसरात घडली आहे.
जुगाराचा डाव जिंकलेल्या मित्राकडे पत्नीने जावे यासाठी पतीने दबाव टाकल्यानंतर बिथरलेल्या पत्नीने घरातून पळ काढला आणि थेट पोलीस ठाणं गाठलं. महिलेने तिच्या पतीची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. 

या महिलेने सांगितलं की, १२ वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं होतं. तिचा पती व्यसनी आहे. महिला म्हणाली, माझा नवरा जुगार खेळून मद्यधुंद अवस्थेत घरी आला आणि मला त्याने त्याच्या मित्राकडे जायला सांगितलं. मी त्याला कारण विचारल्यावर तो म्हणाला, जुगार खेळताना मी तुला पणाला लावलं होतं. परंतु तो डाव मी हरलो. त्यामुळे तुला माझ्या मित्राकडे जावं लागेल.

पतीचं हे बोलणं ऐकून महिला हादरली. या महिलेने सांगितलं की, तिचा पती जबरदस्ती तिला त्याच्या मित्राकडे पाठवण्याचा प्रयत्न करतोय. पीडित महिला पोलिसांना म्हणाली, तो जबरदस्ती करत होता, मला काहीच कळत नव्हतं. त्यामुळे मी पळून आले. माझी मदत करा. महिलेच्या तक्रारीनंतर लिसाडी पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. अद्याप पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला नाही.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.