Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निराधार महिलेला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक : महिलेसह दोघांना अटक

निराधार महिलेला लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक : महिलेसह दोघांना अटकसांगली : खरा पंचनामा

निराधार, विधवा महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन व पैशांचे तसेच तिचे लग्न करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या महिलेसह दोघांना अटक करण्यात आली. विश्रामबाग पोलिसांनी ही कारवाई केली. दोघांनाही पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

वर्षा बजरंग जाधव (सुलतानगादे, ता. खानापूर), शंकर बाबूराव थोरात (वसंतगड, ता. कऱ्हाड) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. पीडिता कोल्हापूर जिल्ह्यातील असून तिने फिर्याद दिली आहे. या संशयितांनी तिचा दोन वेळा जबरदस्तीने विवाह लावला. त्यानंतर तिला तिसऱ्या विवाहासाठी नेत असतानाही पीडितेने आरडाओरडा केला. सामाजिक कार्यकर्ता व नागरिकांच्या मदतीने तिला नेत असलेली कार थांबवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. 

हा प्रकार १ एप्रिल ते २३ मे दरम्यान घडला. पीडितेच्या पतीचे बारा वर्षांपूर्वी निधन झाले आहे. कुटुंबाचा भार तिच्यावर आहे. १५ एप्रिल रोजी तिला तिची मैत्रिण भेटली. पीडितेने ‘जगणे कठीण झाले आहे, काहीतरी काम असेल, तर सांग’ असे मैत्रिणीला सांगितले. मैत्रिणीने संशयित वर्षा हिचा नंबर दिला. नंतर संशयित वर्षा व पीडितेचा संपर्क झाला. ५० ते ६० हजारांची नोकरी देण्याचे आमिष दाखवले. दोघींची कराड येथे भेट झाली. पीडितेच्या गरिबीचा गैरफायदा घेत संशयिताने फूस लावली. ‘तुला एकाशी लग्न करायचे आहे, तू सुखी राहशील आणि दरमहा ५० हजार मिळतील,’ अशी बतावणी केली. मात्र पीडितेने नकार दिला असता तिला जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले. 

त्यानंतर एक मे रोजी ६५ वर्षीय वृद्धासमवेत तिचा कराडला विवाह लावून दिला. नंतर पीडिता वृद्धासमवेत पनवेल येथे राहू लागली. वृद्धास ती अन्य धर्मिय असल्याचे समजल्यानंतर त्याने नांदवण्यास नकार दिला आणि संशयित जाधव हिच्या घरी आणून सोडले. त्यानंतर वृद्धाने पैशांची मागणी करण्यास सुरवात केली.

दरम्यान, त्याच कालावधीत सांगली जिल्ह्यातील एका गावातील व्यक्तीचे लग्न जुळत नसल्याची माहिती पुढे आली. त्यास हेरून ९ मे रोजी जबरदस्तीने विवाह करून देण्यात आला. त्यानंतर १५ मे रोजी पीडितेस पुन्हा कराडमध्ये सोडण्यात आले. जाधवने पीडितेचे सोने व अन्य ऐवज काढून घेत बसमध्ये बसवले. नंतर पीडितेस धमकवण्यास सुरवात केली. 

संशयितानी पीडितेला वानलेसवाडी येथे येण्यास सांगितले. पीडिता काल सायंकाळी तेथे आली. प्रशांत सदामते व तिची भेट झाली.  संशयितही कार (एमएच १४ एपी ९८२८) घेऊन आले. संशयित जाधव व तिचा भाऊ शंकर थोरात गाडीत होते. पीडितेला धमकावत तिसऱ्या लग्नासाठी जबरदरस्ती केली. अक्षतेनंतर एक लाख रुपये खात्यावर जमा करू, अशी बतावणी केली. पीडितेने आरडाओरडा केला. ते पाहून नागरिकांनी गाडी थांबली. पोलिसांना बोलावून घेत भांडाफोड केला. पोलिसांनी संशयितांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.