Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कुपवाडमधील 'रोहिणी' कोल्ड स्टोरेजवर जीएसटीचे छापे : आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

कुपवाडमधील 'रोहिणी' कोल्ड स्टोरेजवर जीएसटीचे छापे : आक्षेपार्ह कागदपत्रे जप्तसांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्ह्यातील कुपवाड येथे असलेल्या रोहिणी कोल्ड स्टोरेजवर जीएसटीच्या पथकाने छापे टाकले आहेत. सोमवारी सकाळपासून जीएसटीचे पथक कागदपत्रे तपासत असल्याची माहिती आहे. जीएसटी चुकवल्यामुळे ही कारवाई केली जात असल्याची चर्चा आहे. मात्र या कारवाईबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली आहे. पथकाने काही आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेतल्याचे समजते. 

कुपवाड येथे रोहिणी कोल्ड स्टोरेज आहे. सोमवारी सकाळपासून राज्य जीएसटी विभागाचे कोल्हापूर येथील एक पथक या स्टोरेजवर छापे टाकून कंपनीची कागदपत्रे तपासत असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. जीएसटीचे पथक नेमकी कशाची तपासणी करत आहे याची माहिती मिळू शकली नाही.

जीएसटी विभागाने कर चुकवेगिरी प्रकरणी या स्टोरेजवर छापे टाकल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र राज्य जीएसटी विभागाच्या कोल्हापूर येथील कोणत्याही अधिकाऱ्याने याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. जीएसटीची कारवाई पूर्ण झाल्यानंतरच या तपासणीचे खरे कारण पुढे येणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.