माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह तिघांची कर्नाटकचे निरीक्षक म्हणून नियुक्ती
नवी दिल्ली : खरा पंचनामा
कर्नाटकात काँग्रेसचे 135 आमदार निवडून आले आहेत. बहुमताचा आकडाही पार केला आहे. रविवारी सायंकाळी कर्नाटक विधिमंडळ नेता निवडीसाठी काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह तिघांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सुचनेनुसार निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचे ट्विट के. सी. वेणूगोपाल यांनी केले आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र सिंग, माजी सरचिटणीस दीपक बबारीया यांचा समावेश आहे.
काँग्रेसला अच्छे दिन येताच काँग्रेसने जुन्या शिलेदारांना पुन्हा महत्वाची जबाबदारी दिल्याचे दिसून येत आहे. सुशीलकुमार शिंदे यांच्या या नियुक्तीने महाराष्ट्रात काँग्रेस आणखी सक्रिय होण्याची चिन्हे आहेत. शिवाय शिंदे यांना राष्ट्रीय पातळीवरही मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे संकेत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.