Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालकपदी यशवंतराव माळी बिनविरोध

जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालकपदी यशवंतराव माळी बिनविरोध



सांगली : खरा पंचनामा

सांगली जिल्हा सहकार बोर्डाची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये उद्योगपती यशवंतराव माळी यांची संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत आतषबाजी केली. निवडीनंतर अनेक संस्थांमार्फत माळी यांचा सत्कार करण्यात आला. 

यशवंतराव माळी सध्या सांगली टिंबर मर्चंट पतसंस्थेचे चेअरमन आहेत. सहकार क्षेत्रात गेल्या १५ वर्षापेक्षा अधिक काळ ते सक्रिय आहेत. सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव लक्षात घेऊन जिल्हा सहकार बोर्डाच्या संचालक मंडळात त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. टिंबर मर्चंट पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी गोरगरीबांसह अनेक व्यापाऱ्यांना मदतीचा हात दिला आहे. 

माळी यांच्या बिनविरोध निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. मार्केट यार्ड येथील व्यापारी तसेच विविध संस्थांसह सांगली टिंबर मर्चंट पतसंस्थेमार्फत त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.