Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत भरदिवसा फ्लॅट फोडून पावणे आठ लाखांचे दागिने लंपास

सांगलीत भरदिवसा फ्लॅट फोडून पावणे आठ लाखांचे दागिने लंपास 



सांगली : खरा पंचनामा 

शहरातील माधवनगर रस्त्यावर असणाऱ्या मीरा हाऊसिंग सोसायटीतील एक बंद फ्लॅट भरदिवसा फोडला. चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून ७ लाख ४२ हजार ५०० रुपयांचे दागिने लंपास केले. रविवारी दुपारी ही घटना घडली. 

याप्रकरणी मंगेश मुरलीधर शहा (वय ४० रा. सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मंगेश शहा यांची ट्रॅव्हल एजन्सी आहे. त्यांची आई उषा शहा या मीरा हाऊसिंग सोसायटीत एकट्याच राहतात. उषा शहा या त्यांची मैत्रीण वंदना गोरे यांच्या घरी कार्यक्रम असल्याने रविवारी दुपारी गेल्या होत्या. 

यावेळी चोरट्यांनी बंद फ्लॅटवर पाळत ठेऊन दरवाजाला लावलेले कुलूप आणि कडी-कोयंडा तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने असा एकूण ७ लाख ४२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सायंकाळी चारच्या सुमारास शहा या घरी आल्या असता त्यांना घरचे कुलूप तुटल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आत जाऊन पहिले असता कपाटातील साहित्य विस्कटलेले होते. त्यानंतर त्यांनी याची माहिती विश्रामबाग पोलिसांना दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.