Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सुषमा अंधारे यांचा मतदारसंघ ठरला!

सुषमा अंधारे यांचा मतदारसंघ ठरला!



मुंबई : खरा पंचनामा

लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटानं जोरदार तयारी सुरू केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे म्हणजे तत्कालीन शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती हे दोन बालेकिल्ले ढासळले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही बालेकिल्ले पुन्ह सर करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. इतकंच नव्हे तर अमरावतीसाठी सुषमा अंधारेंचं नाव निश्चित केल्याचे समजते. छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघावर मागील 3 दशकांपासून शिवसेनेचं वर्चस्व होतं. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा इम्तियाज जलील यांनी पराभव केला.

जलील यांना मिळालेली वंचित बहुजन आघाडीची साथ आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी घेतलेली तब्बल पावणेतीन लाख मतं यांमुळे चंद्रकांत खैरेंचा धक्कादायक पराभव झाला होता. त्या निवडणुकीत तर काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिटही जप्त झालं होतं. पण आता छत्रपती संभाजीनगरचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट सज्ज झालाय. मात्र 2024च्या निवडणुकीत चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देणार की अंबादास दानवेंना उमेदवारी मिळणार? यावरून प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.