Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चक्क आंब्याच्या झाडावरून पडला पैशांचा पाऊस!

चक्क आंब्याच्या झाडावरून पडला पैशांचा पाऊस!म्हैसूर : खरा पंचनामा

बुधवारी सकाळी कर्नाटकात आयकर विभागाने अनेक ठिकाणी छापे टाकले. म्हैसूर येथील सुब्रमण्यम राय यांच्या घरावरही छापा टाकला. अधिकाऱ्यांना एका आंब्याच्या झाडात लपवून ठेवलेले करोडो रुपये सापडले आहेत. पथकाने आंब्याच्या झाडावर बॉक्समध्येलपवून ठेवलेले एक कोटी रुपये जप्त केले. यावेळी चक्क आंब्याच्या झाडावरून पैशांचा पाऊस पडला असे बोलले जात आहे.

म्हैसूर येथील सुब्रमण्यम राय यांच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला, तेथे झाडावरील बॉक्समध्ये ठेवलेले एक कोटी रुपये जप्त करण्यात आले. पुत्तूरमधील काँग्रेसचे उमेदवार अशोक कुमार राय यांचे भाऊ म्हैसूर येथील सुब्रमण्यम राय यांच्या घरावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. आंब्याच्या झाडावरील बॉक्समध्ये पैसे लपवून ठेवले होते. एक कोटींची रोकड जप्त केल्यानंतरही अधिकाऱ्यांचे धाडसत्र सुरूच आहे. 

आयटीच्या छाप्याचा व्हिडीओही समोर आला आहे, यामध्ये आयटी अधिकारी आंब्याच्या झाडाच्या फांदीवर ठेवलेल्या बॉक्समध्ये लक्ष केंद्रित करून चौकशी करत असल्याचे दिसून येते. हा बॉक्स उघडला असता त्यात एक कोटी रुपयांच्या करकरीत नोटा आढळून आल्या.

यापूर्वी भाजप आमदार मदल विरुपक्षप्पा यांच्या घरातून सुमारे सहा कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. तर त्यांच्या मुलाच्या कार्यालयातून दोन कोटींहून अधिक रोकडही जप्त करण्यात आली आहे. त्यानंतर आमदार पुत्र प्रशांत मदाल याला अटक करण्यात आली. घरातून आठ कोटी जप्त झाल्यानंतर त्यांनी कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट लिमिटेड कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.

मदल विरुपक्षप्पा कर्नाटकच्या दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरी या मतदार संघातील भाजपचे आमदार आहेत. त्यांचे पुत्र प्रशांत मदल यांना ४० लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.