Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात जातीय दंगली घडवण्याचा घाट : सतेज पाटील

कोल्हापुरात जातीय दंगली घडवण्याचा घाट : सतेज पाटीलकोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापुरात जातीय दंगली घडवण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील काही ठिकाणी धार्मिक वादाच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

मिरजेत 2009 मध्ये घडलेल्या दंगलीनंतर कोल्हापुरात शिवसेनेचे चार तर भाजपचे दोन आमदार निवडून आले होते. याचा फटका खुद्द सतेज पाटील यांनीही बसला होता. तोच कित्ता आता हे सरकार गिरवत असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे.

कर्नाटकातील 40 टक्के कमिशनचा पॅटर्न कोल्हापुरात कोल्हापुरातील रस्त्यांसाठी आम्ही शासनाकडून निधी मंजूर करून आणला होता. तो रद्द करून बाकडी, ओपन जिम करिता वळवण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. यामधून कर्नाटक राज्यातील 40 टक्के कमिशनचा पॅटर्न कोल्हापुरात येऊ पाहत आहे, अशी टीकाही सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.