Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ट्रॅव्हल्स-कंटेनर-शिवशाही-कारच्या विचित्र अपघातात 4 ठार!

ट्रॅव्हल्स-कंटेनर-शिवशाही-कारच्या विचित्र अपघातात 4 ठार!सातारा : खरा पंचनामा

पुणे-सातारा महामार्गावर भोर तालुक्यातील वरवेजवळ कंटेनर, एक शिवशाही, ट्रॅव्हल्स आणि कार यांच्या झालेल्या विचित्र अपघातात चौघे जखमी झाले आहेत. रविवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.

ऋतुजा रवींद्र चव्हाण (वय ९ रा. खडकमाळ, उत्तमनगर), शिवराज कुमार एच आर (रा. होसैहळ्ळी कर्नाटक) अन्य दोन अशी मृतांची नावे आहेत. सुनंदा रवींद्र चव्हाण (वय ४२ खडकमाळ, उत्तमनगर), रत्ना रवींद्र पुजारी (वय ३८), रवींद्र रामा पुजारी (वय ४१, दोघेही रा. ठाणे मुंबई), विना प्रभाकर गौडा (वय ३४), ज्योती जयराम गौडा (वय ३९), पर्वतमा देवे गौडा (वय ४२), हेमा अण्णा गौडा (वय ३५ सर्व रा. मुंबई), मिनाक्षी मायशेट्टी गौडा (वय ३५), संजु रवी गौडा (वय २४), प्रदीप नज्जाप्पा गौडा (वय २५) अशी जखमींची नावे आहेत.

कर्नाटक येथुन आलेली ट्रॅव्हल्स बस (क्र. के ऐ ५१ ए एफ ५७०७) पुण्याकडे जात असताना बसने सेवा रस्त्यावर डाव्या बाजूस युटर्न मारला. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने (एम एच ४६ ऐ के ६३०९) बसला जोरदार धडक दिल्याने बस महामार्गावर जागीच उलटली. यात लक्झरी चालक शिवराज कुमार जागीच ठार झाला. तर धडक दिलेला कंटेनर हा सातारा बाजूकडे जाणाऱ्या दिशेने महामार्गावर घुसला. पुण्याकडून येणाऱ्या कंटेनरला (क्र. एम एच ०४ एच वाय ०२७९) धडकला. त्यानंतर तो कंटेनर शेजारून जाणाऱ्या शिवशाही बसला (क्र. एम एच ०९ ई एम १३८०) धडकला. यामध्ये शिवशाही बसमधील मुलगी क्रुतुजा ठार झाली. यावेळी एका कारने कंटेनरला पाठीमागून धडक दिली. यात कारमधील सर्व प्रवाशी किरकोळ जखमी झाले.

अपघात होताच राजगड पोलीस, महामार्ग पोलीसांनी धाव घेतली. तीन क्रेन च्या साह्याने अपघातातील वाहने बाजूला करून जखमींना पाच रुग्णवाहिका मधुन जवळच्या रुग्णालयात दाखल केले. जखमीवर नसरापूर, शिवापूर व कापुरव्होळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.