Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात : 50 ठार, 132 जखमी

ओडिशामध्ये रेल्वेचा भीषण अपघात : 50 ठार, 132 जखमी



बालासोर : खरा पंचनामा

ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांचा भीषण अपघात झाला आहे. कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसली. त्यानंतर रेल्वेचे काही डब्बे रुळावरून घसरले. बहनगा स्टेशनजवळ संध्याकाळच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये 50 जण ठार झाले असून 132 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बालासोरमधील बहनगा स्टेशनजवळ शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात झालेली धडक इतकी भीषण होती की, कोरोमंडल एक्स्प्रेस रुळावरून उतरली. या अपघातात जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर, एक्स्प्रेसचे डब्बे पलटल्याने काही प्रवासी अडकले असल्याचे म्हटले जात आहे. सध्या या मार्गावरून जाणारी रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली आहे.

विशेष मदत आयुक्त कार्यालयाने माहिती दिली की, अपघातस्थळी शोध आणि बचाव कार्यासाठी पथके घटनास्थळी पोहोचली आहेत. त्याचबरोबर बालासोरच्या जिल्हाधिकाऱ्यांनाही सर्व आवश्यक व्यवस्था करण्यासाठी घटनास्थळी पोहोचण्यास सांगण्यात आले असून राज्यस्तरावरून काही अतिरिक्त मदतीची आवश्यकता असल्यास एसआरसीलाही कळविण्यात आले आहे. याशिवाय रेल्वे रुळावरून डब्बे हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्याचवेळी, एका रुळावर दोन गाड्या कशा आल्या याचा तपासही रेल्वेने सुरू केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.