Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मिरजेत सामाजिक सौहार्द राखण्यासाठी सहकार्य करा पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिलडा यांचे आवाहन

मिरजेत सामाजिक सौहार्द राखण्यासाठी सहकार्य करा
पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिलडा यांचे आवाहनमिरज : खरा पंचनामा

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये घडत असलेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिलडा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहरात शांतता कमिटी व मोहला कमिटीची बैठक झाली. यावेळी गिलडा यांनी सामाजिक सौहार्द राखण्यासाठी सहकार्य करा असे आवाहन केले.

ही बैठक मिरज शहर पोलीस ठाण्यात घेण्यात आली. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. तसेच शहरात व्हाट्सअप, सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारा अपप्रचार व धार्मिक भावना भडकवण्याच्या बाबत असणाऱ्या पोस्टबाबत जागरूक राहण्याबाबत श्री. गिलडा यांनी आवाहन केले.

यावेळी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी संदीप चव्हाण, प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकारी वैशाली कदम, मिरज शहरचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव, वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक श्री. पालवे, नगरसेवक निरंजन आवटी, संजय मेंढे, करण जामदार, अय्याज नाईकवडी, दिगंबर जाधव, माधव गाडगीळ, भाजपचे नेते विलास देसाई, यांच्यासह मिरज सुधार समिती,परिवर्तन समिती आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.