Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ब्रिजभूषण शरण सिंग यांचे थेट मोदी, शाहना आव्हान?

ब्रिजभूषण शरण सिंग यांचे थेट मोदी,  शाहना आव्हान?दिल्ली : खरा पंचनामा

कुस्तीगीर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावरील कारवाईच्या मागणीसाठी दिल्लीत आंदोलन केलं. मात्र अद्याप ब्रिजभूषण यांच्यावर कारवाई झालेली नाही.

त्यातच सोमवारी ब्रिजभूषण सिंग यांनी स्वतःचीच उमेदवारी जाहीर केली आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक कैसरगंज मतदारसंघातून लढणार, असं ब्रिजभूषण म्हणाले आहेत. त्यामुळे त्यांनी मोदी-शाहांना एक प्रकारचं आव्हान दिल्याचं समजलं जात आहे.

ब्रिजभूषण यांचा तीन लोकसभा मतदारसंघात प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. आज त्यांनी कैसरगंज लोकसभा लढणार असल्याचं सांगून स्वतःची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे ब्रिजभूषण हे पक्षालाही जुमानत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बृजभूषण हे तीन वेगवेगळ्या मतदारसंघांमधून खासदार म्हणून लोकसभेत निवडून गेलेले आहेत. गोंडा मतदारसंघातून १९९१, १९९८, १९९९ मध्ये ते जिंकले. त्यानंतर ते बलरामपूरधून २००४ मध्ये निवडून गेले. २००९ मध्ये ते केसरगंजमधून खासदार झाले. जिथे समाजवादी पक्षाचा दबदबा आहे तिथे भाजप जिंकण्याची तयारी करीत आहे. मैनपुरी, रामपूर, आजमगड, रायबरेली या भागावर बृजभूषण यांचं वर्चस्व आहे.

ब्रिजभूषण शरण सिंग यांचं राम मंदिर आंदोलनाशी नातं आहे. बाबरी प्रकरणात ते आडवाणी, जोशी, कल्याण आणि उमा भारती यांच्यासह ४० आरोपींमध्ये होते. आडवाणी यांच्या रथयात्रेमध्ये अयोध्या आणि आजूबाजूच्या परिसरात ते सक्रीय होते. १९९१ मध्ये जेव्हा पहिल्यांदा जेव्हा त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली तेव्हा त्यांच्यावर ३४ केसेस होत्या. तेव्हा भाजपने त्यांना गोंडाचा रॉबिनहुड म्हणून गौरवित केलं होतं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.