मिरजेत बंगल्याला भीषण आग : पाच लाखांचे नुकसान
मिरज : खरा पंचनामा
मिरज शहरातील गाढवे चौक येथील महाबळ यांच्या बंगल्याला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेनंतर अग्निशमन विभागाच्या चार गाड्या तातडीने दाखल झाल्या. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत ही आग आटोक्यात आणली.
मिरजेतील गाढवे चौक येथे प्रशांत महाबळ यांचा बंगला आहे. या बंगल्याला मंगळवारी दुपारी अचानक आग लागली. बंगल्यात मोठ्या प्रमाणात फर्निचर असल्याने काही क्षणात बंगल्यातील पहिल्या मजल्यावरील साहित्याने पेट घेतला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. या आगीत बंगल्यातील चार ते पाच लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले असल्याचे सांगण्यात आले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.