कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ!
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
प्रसिद्ध किर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराजांना दिलासा दिल्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन आणि राज्य सरकारने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. त्यानंतर हे आदेश देण्यात आले आहेत.
विनोदी किर्तनासाठी राज्यभरात प्रसिद्ध असलेले इंदुरीकर महाराज यांनी काही दिवसांपूर्वी लिंगभेदाबाबत एक वक्तव्य केलं होतं. यामध्ये त्यांनी सम तारखेला आणि विषय तारखेला शरिरसंबंध आल्यानंतर कसा मुलगा किंवा मुलीचा जन्म होतो याबद्दल विधान केलं होतं. या वक्तव्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती.
तक्रार दिल्यानंतर हे प्रकरण जेएमएफसी कोर्टात चाललं, त्यानंतर कोर्टाने इंदुरीकर महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पुढे हे प्रकरण सेशन कोर्टात गेलं. सेशन कोर्टात हा गुन्हा रद्द करण्यात आला.
त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि राज्य शासनाच्यावतीने औरंगाबाद खंडपीठात धाव घेण्यात आली. त्यानंत औरंगाबाद खंडपीठाने या प्रकरणात आज या प्रकरणात निकाल देत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.