छापा पडला म्हणून दुसऱ्या मजल्यावरून उडी मारलेला तरुण ठार!
कोल्हापूर : खरा पंचनामा
कोल्हापूर शहरातील राजेंद्रनगर येथील एका इमारतीच्या दूसऱ्या मजल्यावर सहाजण जुगार खेळत होते. याची माहिती मिळाल्यानंतर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी तेथे छापा टाकला.
त्यावेळी कारवाईच्या भीतीने दोघांनी इमारतीवरून उड्या मारल्या, त्यात साहील मायकेल मिणेकर (वय २६) याचा जागीच मृत्यू झाला तर दत्तात्रय देवकुळे गंभीर जखमी झाला. राजेंद्र नगर येथील एका दुमजली इमारतीत सहाजण जुगार खेळत असल्याची माहिती रविवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिस अकराच्या सुमारास तेथे पोहोचले असता कारवाईच्या भीतीने साहिल आणि दत्तात्रय यांनी उड्या मारल्या. इमारती खाली असलेल्या दगडावर डोके आपटल्याने साहिलचा जागीच मृत्यू झाला.
उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह सीपीआरमध्ये नेण्यात आला. तर दत्तात्रय याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. साहिल हा खासगी कंपनीत नोकरी करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान सीपीआर परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.