Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहने सोडून दरोडेखोरांचा पोलिसांना गुंगारा मिरज बायपासला दुचाकी तर भोसेत सापडली टाटा सफारी

दोन वेगवेगळ्या ठिकाणी वाहने सोडून दरोडेखोरांचा पोलिसांना गुंगारा मिरज बायपासला दुचाकी तर भोसेत सापडली टाटा सफारी सांगली : खरा पंचनामा 

शहरातील रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा टाकण्यासाठी चोरट्यांनी वापरलेली दोन वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. चोरट्यांनी एक दुचाकी मिरज बायपास रस्ता येथे सोडली होती तर सफारी भोसे येथे सोडल्याचे स्पष्ट झाले. चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी गुन्ह्यातील वाहने सोडून पोलिसांना गुंगारा दिला आहे. 

गुन्ह्यात वापरलेली सफारी गाडी (एमच 04 इटी 8894) सोमवारी मिरज तालुक्यातील भोसे येथील यल्लमा मंदिराच्या पिछाडीस सापडली. तर रविवारी रात्री एक पल्सर दुचाकी मिरज म्हैसाळ रस्त्यावरील बायपास रस्त्यावर सापडली. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहेत. दरोडा टाकल्यानंतर चोरटे मिरजेच्या दिशेने गेल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजद्वारे स्पष्ट झाले होते. त्यानंतर एलसीबी तसेच पोलिसांची पथके त्यांच्या मागावर गेली होती. 

त्यावेळी रविवारी रात्री मिरजेतील बायपास रस्त्यावर चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी पोलिसांना सापडली. पंचनामा करून ठसे तज्ञांनी ठसे घेतल्यानंतर ती जप्त करण्यात आली. 

सोमवारी मिरज तालुक्यातील भोसे येथील यल्लमा मंदिराजवळ सफारी गाडी सापडली. पोलिसांनी तेथे धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर ठसे तज्ञांनी ठसे घेतल्यानंतर ती सफारी जप्त करण्यात आली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.