Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एशियन कबड्डी चॅम्पियनशीपमध्ये भारताचा आठव्यांदा शड्डू घुमला!

एशियन कबड्डी चॅम्पियनशीपमध्ये भारताचा आठव्यांदा शड्डू घुमला!



बुसान : खरा पंचनामा

कोरिया येथील बुसान येथे झालेल्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने इराणचा 42 - 32 असा पराभव करत आठव्यांदा एशियन कबड्डी चॅम्पियनशिपवर कब्जा केला. आतापर्यंत 9 वेळा झालेल्या स्पर्धेत आठव्यांदा भारताचा पुन्हा शड्डू घुमला आहे.

भारताचा कर्णधार पवन शेरावतने सुपर 10 पाईट्स मिळवत विजयात मोठा वाटा उचलला. सामन्याच्या पहिल्या पाच मिनिटात भारतीय पुरूष संघाने इराणवर वर्चस्व मिळवले होते. त्यानंतर सामन्याच्या 10 व्या मिनिटाला इराणचा संपूर्ण संघ बाद झाला. पवन शेरावत आणि अस्लम इनमादारने यशस्वी रेड केली होती. त्याचबरोबर काही टॅकल पॉईट देखील मिळवले.

या दमदार सुरूवातीनंतर भारतीय कबड्डी संघाने आपली लीड सहजरित्या वाढवली. भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी केली. इराणला काही बोनस पॉईट देखील मिळाले मात्र सामन्याच्या 19 व्या मिनिटाला भारतीय संघाने पुन्हा एकदा ऑल आऊट केले.

पहिल्या हाफपर्यंत भारतीय संघ 23-11 असा आघाडीवर होता. मात्र इराणचा कर्णधार मोहम्मदरझा शादलोई चियानेह याने 29 व्या मिनिटाला दोन रेड पॉईट आणि सुपर रेडच्या जोरावर भारताला ऑल आऊट केले. सामना संपायला दोन मिनिटे शिल्लक असताना इराणनने भारताची आघाडी 38-31 अशी कमी केली. मात्र दबावाच्या वातावरणात देखील भारतीय संघाने सामना 42- 32 असा जिंकत आपले आठवे विजेतेपद पटकावले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.