Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

देवेंद्र फडणवीस यांचा रुसवा अजूनही कायम!

देवेंद्र फडणवीस यांचा रुसवा अजूनही कायम!मुंबई : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर नाराज आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एकत्र येणं टाळलं. मुंबईत आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा आज 75 वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव छापलेलं आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या आजच्या कार्यक्रमांमध्ये या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचा उल्लेख नाही. त्यामुळे त्यांचा जाहिरातीवरून असलेला रुसवा कायम असल्याचे बोलले जात आहे.

एसटीचा "अमृतमहोत्सवी " वर्धापन दिन सोहळा आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नरिमन पॉईट इथल्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात संध्याकाळी चार वाजता होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत.

शिवसेनेकडून (शिंदे गट) काल महाराष्ट्रातील बहुतांशी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली होती. 'देशात मोदी, महाराष्ट्रात शिंदे' अशा आशयाची ही जाहिरात होती. तसेच, या जाहिरातीत मुख्यमंत्रीपदासाठी 26.1 टक्के जनतेची शिंदेना तर 23.2 टक्के जनतेची पसंती फडणवीसांना असल्याचा उल्लेख होता.

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज बाहेर देखील दौरे होते, पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते मोठ्या सभा आणि विमान प्रवास टाळत आहेत. यामुळेच आज त्यांनी फक्त सह्याद्रीवर बैठका आयोजित केल्या आहेत, असे सांगण्यात आले.

कालच्या जाहिरातीवर मोठं वादंग उठल्यानंतर त्यातील चूक दुरुस्त करण्यात आलेली आहे. आज पुन्हा एकदा वर्तमानपत्रामध्ये नव्यानं जाहिराती देण्यात आल्या आहेत. या नव्या जाहिरातीमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांचा फोटो झळकतो आहे. दोघांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राची साथ दिली आहे, अशी ग्वाही दिली जात आहे. नरेंद्र मोदी यांच्या साथीनं विकासाचे पर्व महाराष्ट्रात आलं आहे, असं सांगितलं जात आहे. महत्त्वाचं म्हणजे, कालच्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना डिवचण्याचा प्रयत्न झाला होता, तो दुरुस्त केला गेला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.