जतला पाणी द्या, बेळगावमधील मराठी भाषिकांना जपा!
विश्वजित कदम यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना साकडे
सांगली : खरा पंचनामा
सांगलीचा नागरिक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, आमच्या दुष्काळी जत तालुक्याला कर्नाटकने पाणी द्यावे. तसेच, सन २०१९, २२ मध्ये आलेल्या महापुरामुळे सांगलीकरांचे मोठे हाल झाले. पुरावेळी अलमट्टी धरणातून पाणी सोडावे. बेळगावातील आमच्या मराठी भाषिकांना जपा, असे साकडे आमदार विश्वजित कदम यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना घातले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा आज रविवारी काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगलीत सत्कार करण्यात आला. माजी मंत्री विश्वजित कदम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमातच कदम यांनी सिद्धरामय्यांना साकडे घातले. कदम म्हणाले की, सांगलीचा नागरिक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, आमच्या दुष्काळी जत तालुक्याला कर्नाटकने पाणी द्यावे. आमची मागणी फार नाही. फक्त शेती आणि पिण्यासाठी कर्नाटक सरकारने पाणी द्यावी. सर्वसामान्यांना न्याय देणारे सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते जतच्या नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतील.
सांगलीत 2019-20 मध्ये आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या वेळी अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यात यावे, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे बेळगावमध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात. त्यांना सांभाळावे, अशी आमची मागणी आहे, असेही कदम यांनी नमूद केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.