Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ईडीचे तत्कालीन उपसंचालक सचिन सावंत यांना ईडीकडूनच अटक!

ईडीचे तत्कालीन उपसंचालक सचिन सावंत यांना ईडीकडूनच अटक!



मुंबई : खरा पंचनामा

सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ईडी छापा टाकला. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत ईडीची शोध मोहीम चालू होती. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी हा छापा टाकण्यात आला. यावेळी सावंत यांच्या नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेण्यात आली. त्यानंतर सावंत यांना अटक करण्यात आली आहे.

सावंत याआधी ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी एका बेहिशोबी मालमत्तेच्या प्रकरणाची चौकशी केली होती. सीबीआयने अधिकाऱ्याविरुद्ध नोंदवलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या गुन्ह्याच्या आधारे हा छापा टाकण्यात आला.

काही हिरे कंपन्यांद्वारे बेकायदेशीरपणे 500 कोटींहून अधिक रक्कम आपल्या खात्यातून वळवली होती. याप्रकरणाची सचिन सावंत यांनी चौकशी केली होती. त्यात अटक करण्यात आलेल्या एका आरोपीने सचिन सावंत यांच्याविरोधात फिर्याद दिली होती.

या तक्रारीमुळे सीबीआयने सावंत यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला. दरम्यान मंगळवारी ईडीने सचिन सावंत यांच्या निवासस्थानासह मुंबईतील विविध ठिकाणी छापे टाकून चौकशी केली. सध्या सावंत यांच्याकडे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पद आहे. या प्रकरणी मध्यरात्रीपर्यंत शोधमोहीम सुरू होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.