साहेबांवर टीका होताना पक्षातील वरीष्ठ नेते गप्प का?
पुणे : खरा पंचनामा
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपा आ. गोपीचंद पडळकर यांनी एकेरी उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याव्यतिरिक्त एकाही नेत्याने चकार शब्द काढला नव्हता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पक्षातील नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.
ते म्हणाले, महाराष्ट्रात काही नवीन तयार झालेले नेते खालच्या पातळीवर जाऊन बोलत पदाची अपेक्षा करत असावेत. भाजपाचे स्वयंघोषित नेते खालच्या पातळीवर बोलतात तेव्हा वरिष्ठ नेते शांत असतात. याचा अर्थ त्यांचेही याला पाठबळ असल्याचं दिसतं. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत रोहित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.
शरद पवारांनी अनेक नेत्यांना मोठं केलं. पण, शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातं, तेव्हा कार्यकर्तेच लढतात. ही गोष्ट पाहिल्यावर मलाही खंत वाटते. ज्या नेत्यांनी पद भूषावली आहेत, ते याबद्दल काहीच बोलत नाहीत. फक्त अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून, बाकीचे सर्व शांत बसले आहेत. आम्ही कार्यकर्ता म्हणून लढत राहू. शरद पवारांवर जो कोणी बोलेल, त्याला उत्तर देऊ. पण, नेते गप्प का बसतात हे कळत नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.