Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गुन्हेगारीच्या बिमोडासाठी शास्त्रीय, तांत्रिक तपासावर भर द्या : महानिरीक्षक फुलारी 18 व्या पोलिस कर्तव्य मेळाव्यात सातारा विजेते तर कोल्हापूरला उपविजेतेपद

गुन्हेगारीच्या बिमोडासाठी शास्त्रीय, तांत्रिक तपासावर भर द्या : महानिरीक्षक फुलारी
18 व्या पोलिस कर्तव्य मेळाव्यात सातारा विजेते तर कोल्हापूरला उपविजेतेपदपुणे : खरा पंचनामा

सध्याच्या गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिस अधिकारी, अमलदारांनी तपासात आधुनिकता आणली पाहिजे. शास्त्रीय आणि तांत्रिक तपासावर भर दिल्यास गुन्हेगारी नियंत्रणात येऊ शकते. त्यामुळे अशा तपासावर भर द्या अशा सूचना कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिल्या.


पुण्यातील पोलिस संशोधन केंद्रात आयोजित केलेल्या 18 व्या परिक्षेत्र पोलिस कर्तव्य मेळाव्याच्या सांगता समारंभात ते बोलत होते. पुण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्याम चांडक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या मेळाव्यात सातारा दलाने विजेतेपद मिळवले तर कोल्हापूर दलाने उपविजेतेपद पटकावले.

पुण्यातील पोलिस संशोधन केंद्रात दि. 19 ते 21 जुलै दरम्यान हा कर्तव्य मेळावा घेण्यात आला. सांगता समारंभात न्या. चांडक यांनी तांत्रिक आणि शास्त्रीय तपास करून शिक्षेचे प्रमाण वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले. पोलिस अधिकारी, अंमलदार यांची कौशल्यवृद्धी व्हावी तसेच व्यावसायिक निपुणता वाढावी यासाठी 6 विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. अखिल भारतीय कर्तव्य मेळाव्यात सहभागी होण्यासाठी संघ निवडण्यात आला. यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्रातील 106 अधिकारी, अंमलदार सहभागी झाले होते.

या मेळाव्याचे उदघाटन विशेष महानिरीक्षक श्री. फुलारी यांच्याहस्ते करण्यात आले. सांगता समारंभास पुणे ग्रामीणचे अधीक्षक अंकित गोयल, सोलापूर ग्रामीणचे अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सांगलीचे अधीक्षक डॉ. बसवराज तेली, साताऱ्याचे अधीक्षक समीर शेख यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.