Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील 19 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या सोमनाथ वाघ येणार सांगलीत

राज्यातील 19 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या 
सोमनाथ वाघ येणार सांगलीत 



मुंबई : खरा पंचनामा 

राज्यातील 19 पोलिस निरीक्षकांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी हे बदल्यांचे आदेश काढले आहेत. मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सोमनाथ वाघ यांची सांगलीला बदली करण्यात आली आहे. 

नागपूर शहराच्या तृप्ती सोनवणे यांनी नाशिक शहर, जालना येथील सुनील अंबुलकर यांची बुलढाणा येथे, जळगावचे शंकर शेळके यांची अकोला येथे, मुंबईतील संग्रामसिंह पाटील यांची बुलढाणा येथे तर बुलढाणा येथील प्रदीप त्रिभुवन यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे. 

मुंबईतील प्रवीणकुमार बांगर यांची उस्मानाबाद, गडचिरोली येथील गणेश पिसाळ यांची भंडारा येथे, नाशिक शहरचे पराग पोटे यांची नाशिक ग्रामीण येथे, मुंबई येथील संजय बांगर यांची रायगड येथे, ठाणे शहरचे समशेर तडवी यांची ठाणे ग्रामीण, मुंबईतील सुनील पवार यांची मीरा-भाईंदर येथे, धुळे प्रशिक्षण केंद्रातील दीपक पाटील यांची धुळे येथे बदली करण्यात आली आहे. 

नागपूर येथील संजीवनी थोरात यांची चंद्रपूर येथे, नागपुरच्या आशालता खापरे यांची ठाणे शहर येथे, मुंबईतील दत्तात्रय गुंड यांची ठाणे येथे, बुलढाणा येथील विजयसिंह राजपूत यांची जालना येथे, उस्मानाबाद येथील खाजामेनुद्दीन पटेल यांची सोलापूर प्रशिक्षण केंद्र येथे, मुंबईतील ओमकांत चिंचोळकर यांची नांदेड येथे बदली करण्यात आली आहे.


कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.