Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापूर परिक्षेत्रातील 42 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या!

कोल्हापूर परिक्षेत्रातील 42 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या! 



कोल्हापूर : खरा पंचनामा 

कोल्हापूर परिक्षेत्रातील 42 उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 13 जणांना मुदतवाढ देण्यात आली आहे. विनंतीवरून एकाची बदली करण्यात आली आहे, तर 9 जणांच्या विनंती बदल्या अमान्य करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सोमवारी या बदल्यांचे आदेश दिले आहेत. 

कोल्हापूर येथील मनीषा अमृतकर यांची सांगलीत, अभिजित गुरव, किशोर डोंगरे, भाऊसाहेब मलगुंडे, प्रमोद वाघ यांची सातारा येथे बदली करण्यात आली आहे. सांगलीतील सुहास गंगधर यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सांगलीचे विठ्ठल शेळके यांची कोल्हापूर तर कोल्हापूरचे सचिन पांढरे यांची सांगलीत बदली करण्यात आली आहे. सांगलीचे पांडुरंग कन्हेरे यांची पुणे ग्रामीण, नामदेव दांडगे यांची कोल्हापूर, समाधान लवटे, महेश डोंगरे यांची पुणे ग्रामीण येथे बदली झाली आहे. 

सांगलीतील राजू अन्नछत्रे, उदय पोतदार, जगन्नाथ चव्हाण यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. सांगलीतील सोमनाथ कचरे यांची पुणे ग्रामीण, विशाल जगताप यांची सातारा, दत्तात्रय शेडगे यांची पुणे ग्रामीण, जालिंदर जाधव यांची कोल्हापूर येथे बदली करण्यात आली आहे. 

सांगलीतील रोहिदास पवार यांची सोलापूर ग्रामीण, अक्षय ठिकणे यांची सातारा, अनिल पाटील यांची पुणे ग्रामीण येथे बदली करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.