Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पाण्याची मोटर चोरणाऱ्यास अटक

पाण्याची मोटर चोरणाऱ्यास अटक 



जत : खरा पंचनामा 

पाण्याची मोटर चोरणाऱ्या एकास अटक करण्यात आली. त्याच्याकडून मोटर, स्टार्टर, रिडींग मीटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. उमदी पोलिसांनी ही कारवाई केली. 

विठ्ठल आव्वाण्णा माळी (वय 58, रा. बालगाव, ता. जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. 

बालगाव येथील बाबासाहेब मुल्ला यांची पाण्याची मोटर चोरीला गेली होती. ती माळी याने चोरली असल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने माळी याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने चोरीची कबुली दिली. त्याला अटक करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लक्ष्मण खरात, गणेश संकपाळ, प्रशांत कोळी, आप्पासाहेब हाके, सोमनाथ पोटभरे, वहिदा मुजावर, संजय पांढरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.