Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

त्या नेत्यांची लोक धुलाई करतात!

त्या नेत्यांची लोक धुलाई करतात! 



नागपूर : खरा पंचनामा 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची स्पष्ट वक्ते म्हणून ओळख आहे. त्यावरून त्यांना राजकीय किंमत देखील मोजावी लागली आहे. अनेकदा तर त्यांना आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आल्याचा खुलासा करावा लागला आहे. आता पुन्हा त्यांच्या वक्तव्याची चर्चा जोरात सुरू आहे. 

विकास कामाच्या लोकार्पण आणि भूमीपूजनचा कार्यक्रम शनिवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. गडकरी म्हणाले, "माझे स्वप्न आहे, बोटीत बसून अंबाझरी तलाव ते पारडीपर्यंत नाग नदीतून जायचे. लोक म्हणतात तुम्ही काहीही स्वप्न दाखवता. पण लक्षात ठेवा स्वप्न दाखवणारे नेतेच लोकांना आवडतात, पण दाखवलेले स्वप्न पूर्ण करीत नाही अशा नेत्यांची लोक धुलाई केल्याशिवाय राहत नाही. 

गडकरी यांच्या या वक्तव्याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. शिवाय त्यांनी भाजपमधील काहींना हा टोला लगावल्याचीही चर्चा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.