अर्थमंत्रीपद मिळाल्यावर अजितदादा 'सिल्व्हर ओक'वर!
मुंबई : खरा पंचनामा
महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची अपडेट समोर येत आहेत. अर्थ खातं मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. अजित पवारांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला आणि युती सरकारला पाठिंबा देत 9 मंत्र्यांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर झालेल्या बैठकीत अजित पवारांनी शरद पवारांवर टोकाची टीका देखील केली होती.
शरद पवारांनीही अजित पवारांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. दरम्यान आज अचानक अजित पवार सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. या भेटीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांवर होत असलेल्या वार पलटवारादरम्यान अजित पवार शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. अजित पवारांसोबत कोण आहे आणि शरद पवारांच्या निवासस्थानी सुप्रिया सुळे उपस्थित आहेत का? यासंदर्भातील माहिती अद्याप समोर आलेली नाही.
राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्वाची अशी ही बातमी आहे. त्यामुळे अजित पवार या ठिकाणी कोणाला भेटणार आणि काय चर्चा करणार याबाबत आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.