जिल्ह्यातील ५४ पोलिस अंमलदारांच्या अंतर्गत बदल्या
तब्बल ७९ जणांच्या विनंती बदल्या अमान्य
सांगली : खरा पंचनामा
जिल्ह्यातील ५४ पोलिस अंमलदारांच्या विनंतीनुसार जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. तर तब्बल ७९ जणांच्या विनंती बदल्या अमान्य करण्यात आल्या आहेत. बदली झालेल्यांमध्ये ६ सहायक उपनिरीक्षक, २० हवालदार, १२ पोलिस नाईक, १६ पोलिस शिपायांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी बदल्यांचे हे आदेश काढले आहेत.
जिल्ह्यातील अंमलदारांना विनंती बदल्यांसाठी अर्ज करण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार गुरुवारी आस्थापना मंडळाने विनंती बदल्यांसाठी अर्ज केलेल्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यानंतर बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. यामध्ये नियमित बदल्या झालेल्या अंमलदारांनाही विनंती बदलीसाठी अर्ज सादर केले होते. मात्र अंमलदारांच्या अडचणी समजावून घेत ५४ जणांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
त्याशिवाय ७९ अंमलदारांनी विनंती बदल्यांसाठी अर्ज केले होते. मात्र त्या सर्वांचे अर्ज अमान्य करण्यात आले आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.