Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शिंदे गटाचे चौघेजण घेणार शपथ!

शिंदे गटाचे चौघेजण घेणार शपथ!



मुंबई : खरा पंचनामा

अखेर मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला आहे. भाजप नेते अमित शाह यांनी मध्यस्थी केल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा चिढा सुटला आहे. त्यामुळे उरलेल्या मंत्र्यांचा आज किंवा उद्या शपथविधी होण्याची शक्यता असून त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नव्या विस्तारात एकूण 10 जणांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. त्यात भाजप आणि शिंदे गटाच्या प्रत्येकी चार तर राष्ट्रवादीच्या दोघांचा समावेश असणार आहे. शिंदे गटाकडून मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या चार जणांची नावे फिक्स झाली आहेत. या चारही जणांमध्ये पुरुषांचाच समावेश आहे. शिंदे गटात नव्याने आलेल्या मनिषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे यांचा समावेश नसल्याचं सांगितलं जात आहे.

नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. 4-4- 2 असा हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यानुसार शिंदे गट आणि भाजपला प्रत्येकी चार मंत्रिपदे मिळणार आहेत. तर राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदे मिळणार आहेत. शिंदे गटाकडून मंत्रिपदाची शपत घेणाऱ्या चौघांची नावे फिक्सही झाली आहेत. यात भरत गोगावले, अनिल बाबर आणि योगेश कदम यांचा समावेश आहे. म्हणजे नव्या विस्तारात कोकणातून दोघांचा तर पश्चिम महाराष्ट्रातून एकाचा समावेश केला जाणार आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.