Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आगामी निवडणुका स्वबळावर : राज ठाकरे

आगामी निवडणुका स्वबळावर : राज ठाकरे

खेड : खरा पंचनामा

आगामी नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावरच लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खेडमधील कार्यकर्ता मेळाव्यात केली.

कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहपूर्ण वातावरणात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, अनिल शिदोरे, अविनाश जाधव, वैभव खेडेकर आदी उपस्थित होते.

राज ठाकरे म्हणाले, "मनसेचा हा कोकणदौरा पूर्णपणे पक्षबांधणीसाठी आहे. गेल्या पाच-सात वर्षात आपण सगळ्यांनी मोठमोठी भाषणे ऐकली; पण सध्या महाराष्ट्रात कॅरमच्या सोंगट्या कोणत्या भोकात जात आहेत हेच कोणाला कळेनासे झाले आहे; मात्र माझा एकही कार्यकर्ता कुठेही गेला नाही हीच मनसेची ओळख आहे.

सध्याच्या राजकीय उलथापालथीमुळे राज्यातील प्रत्येक मतदाराला जो त्रास झाला आहे तो सर्वांनी येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत व्यक्त करणे गरजेचे आहे. जर तो त्यांनी मतदानातून व्यक्त केला नाही, तर त्यांच्यासारखे अभागी तेच असतील. येत्या निवडणुकीत आपण मागील पालिका निवडणुकीत जे झालं ते विसरून मनसे यापुढील निवडणुका स्वबळावरच लढवणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.