कोयत्याच्या धाकाने जबरी चोरी करणाऱ्यास अटक
सांगली शहर पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
शहरातील शामरावनगर येथे कोयत्याच्या धाकाने लुटणाऱ्या एकास अटक करण्यात आली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून एक धारदार कोयता, रोकड, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी दिली.
अभि विनोद चव्हाण (वय १९, रा. ५० फुटी रोड, सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सांगली शहरचे निरीक्षक श्री. देशमुख यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी राहुल जाधव घरी जात असताना महादेवनगर येथे दोघेजण दुचाकीवरून आले. त्यांनी जाधव यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड जबरदस्तीने काढून घेऊन पसार झाले होते.
पथक चोरट्यांचा शोध घेत असताना यातील संशयित एपीजे अब्दुल कलाम शाळेजवळ थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलिस उपअधीक्षक आण्णासाहेब जाधव, निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मागर्दशर्नाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, सचिन शिंदे, संदीप पाटील, विनायक शिंदे, श्रीपाद शिंदे, झाकीर काझी, संतोष गळवे, गौतम कांबळे, गणेश कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.