हे विश्वासाचे शस्त्रच लढण्यासाठी पुरेसे आहे!
मुंबई : खरा पंचनामा
पक्षातील अभूतपूर्व राजकीय घडामोडीनंतरही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी कायम आहे. आज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी हे विश्वासाचे शस्त्रच लढण्यासाठी पुरेसे आहे अशी भावना जयंत पाटील यांनी ट्विटरवर व्यक्त केली.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मागील काही दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. मात्र पवार साहेबांचे समर्थक म्हणून पदाधिकारी, कार्यकर्त्यांची, सर्वसामान्य लोकांची प्रदेश कार्यालयात लागलेली रीघ पाहून आत्मविश्वास अधिक उंचावला. ज्या लोकांच्या विश्वासावर आपण ही धुरा सांभाळत आहोत, त्यांची अखंड साथ आहे. हे विश्वासाचे शस्त्रच लढण्यासाठी पुरेसे आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.