Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अखेर राहुल गांधींना दिल्लीत मिळाले नवे घर

अखेर राहुल गांधींना दिल्लीत मिळाले नवे घरनवी दिल्ली : खरा पंचनामा

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत नव्या घराच्या शोधात असलेल्या राहुल गांधी यांना अखेर घर मिळालं आहे. दक्षिण दिल्लीतील निझामुद्दीन पूर्वमध्ये असलेल्या थ्री बीएचके घरामध्ये त्यांचा मुक्काम आहे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित यांच्या मालकीचं हे घर असून त्यांच्या आयुष्यातील अखेरचे दिवस या निवासस्थानी घालवले होते.

दोन वर्षांसाठी खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 22 एप्रिल रोजी त्यांचे दिल्लीतील घर रिकामं केलं होतं. त्यांनंतर ते घराच्या शोधात होते. तात्पुरते ते त्यांच्या आई म्हणजे काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी राहत होते.

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शिला दीक्षित येथे वास्तव्य होतं. त्यावेळी राहुल गांधी यांनी त्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली होती. शिला दीक्षित त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये या घरी राहत होत्या. हे घर थ्री बीएचके असून एकूण 1500 स्क्वेअर फूट असल्याची माहिती आहे.

शिला दीक्षित या दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिल्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र आणि दिल्लीचे माजी खासदार संदीप दीक्षित हे या घरात राहत होते. आता राहुल गांधी या घरी राहायला येणार असल्याने संदीप दीक्षित यांनी हे घर रिकामं केल्याची माहिती आहे. राहुल गांधी या ठिकाणी भाड्याने राहणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.