पूर पहायला गेला अन् थेट नदीत पडला!
कोल्हापूर : खरा पंचनामा
गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे नद्या-नाले तुडूंब भरून वाहत असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
कोल्हापुरातील वारणा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी एक व्यक्ती गेला होता. मात्र, पुराचं पाणी पाहत असताना त्याचा तोल गेला आणि तो थेट नदीत पडला. सुदैवाने या तरुणाला झाडाचा आश्रय मिळाला. तो झाडावर अडकून पडला होता. दरम्यान, बचावपथकाने त्याला वाचवलं आहे. त्या तरुणाचे नाव समजू शकले नाही.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.