Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महापालिकेच्या तत्कालीन कंत्राटी अभियंत्यास अटक बोगस बांधकाम परवाना प्रकरण

महापालिकेच्या तत्कालीन कंत्राटी अभियंत्यास अटक
बोगस बांधकाम परवाना प्रकरणसांगली : खरा पंचनामा 

बोगस बांधकाम परवाना प्रकरणी पोलिसांनी आता तत्कालीन कंत्राटी अभियंत्याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी तिघांना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. तर एका संशयिताने अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.

संतोष शंकर अवघडे (वय ४२ रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, सांगली) असे अटक केलेल्या अभियंत्याचे नाव आहे. महापालिकेचा बांधकाम परवाना देण्यासाठी बोगस प्रमाणपत्र बनवून देण्याच्या रॅकेटमध्ये अवघडे यांचा सहभाग असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. यापुर्वी राहूल वाघमारे, नगररचना विभागातील कंत्राटी कर्मचारी महादेव पाटील, पवन झेंडे यांना अटक करण्यात आली आहे. 

सांगलीतील पवन झेंडे आणि संतोष झेंडे या दोघांचा मोकळा प्लॉट आहे. या प्लॉटवर बांधकाम करण्यासाठी त्यांनी बांधकाम परवाना घेण्यासाठी एजंट राहूल वाघमारे यांच्याकडे कागदपत्रे दिली होती. त्यानंतर त्यांना काही दिवसात महापालिकेचा बांधकाम परवाना देण्यात आला. या परवान्याबाबतची माहिती झेंडे यांच्या शेजाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी झेंडे यांना बांधकाम परवाना कसा मिळाला याची माहिती घेतली. त्यावेळी हा परवाना बोगस असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी महापालिकेकडे तक्रार केली. 

त्यावेळी महापालिकेच्या पथकाने पाहणी केली असता बनावट शिक्का, सही असल्याचे समोर आले. तसेच हा बांधकाम परवाना काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्तावच अथवा शुल्कही भरण्यात आले नसल्याचे समोर आले. त्यानंतर याबाबत महापालिकेचे कनिष्ठ अभियंता शाहबाज रहिम शेख यांनी १६ जून रोजी झेंडे बंधूसह चौघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी पवन झेंडे याला अटक केली. त्यानंतर एजंट राहुल वाघमारे, महादेव पाटील अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी दरम्यान संशयित अवघडे याचाही रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने शहर पोलिसांनी अटक केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.