Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दुचाकी चोरून त्याचे सुटे भाग विकणाऱ्या तिघांना अटक सांगली एलसीबीची कारवाई

दुचाकी चोरून त्याचे सुटे भाग विकणाऱ्या तिघांना अटक
सांगली एलसीबीची कारवाई



सांगली : खरा पंचनामा

सांगली, मिरजेसह अन्य ठिकाणाहून दुचाकी लंपास करुन त्याचे सुटे भाग करुन त्यांची विक्री करणाऱ्या टोळीस एलसीबीने अटक केली. त्यांच्याकडून चार दुचाकी आणि चोरलेल्या दुचाकींचे केलेले सुटे भाग असा २ लाख ६६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.

उमर ईर्शाद सुतार, गौस शौकत शेख (दोघेही रा. तिरंगा चौक, शिक्षक कॉलनी, इस्लामपूर, ता. वाळवा ) आणि ऋतुराज ऋषिकेश साठे (रा. म्हैसगाव, ता. माढा, जि. सोलापूर ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून विश्रामबाग पोलीस ठाणे, सांगली शहर, मिरज ग्रामीण आणि शाहुपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेले चार गुन्हे उघडकीस आले आहेत.
 
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दुचाकी चोरट्यांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत.  त्यानुसार चोरट्यांना पकडण्यासाठी एलसीबीने स्वतंत्र पथक तयार केले होते. पोलीस तपासात अटक करण्यात आलेले तीनही संशयीत चोरी केलेल्या दुचाकींची विक्री करण्यासाठी संशयीत उमर सुतार याच्या इस्लामपूर येथील गॅरेजमध्ये थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. 

पथकाने इस्लामपूर येथील शिक्षक कॉलनीत असलेल्या महाराष्ट्र ॲटो गॅरेज परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेल्या दुचाकीचे सुटे केलेले भाग गॅरेजमधून विक्रीसाठी ठेवल्याचे सांगितले. पथकाने दुचाकीचे इंजिन, चेसीस यासह अन्य सुटे भाग तसेच अन्य साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी आणि अन्य सुटे भाग असा मुद्देमाल हस्तगत केला. 

पोलीस निरिक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील विक्रम खोत, बिरोबा नरळे, संदीप गुरव, मच्छिंद्र बर्डे, सागर लवटे, अनिल कोळेकर, सागर टिंगरे, संजय कांबळे, अमर नरळे, अजय बेंदरे आदींच्या पथकाने केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.