Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नृसिंहवाडीत यावर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा!

नृसिंहवाडीत यावर्षीचा पहिला दक्षिणद्वार सोहळा!नृसिंहवाडी : खरा पंचनामा

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात यावर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा दुपारी एक वाजता  झाला. अधिक महिना व रविवार यामुळे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली उसंत घेतलेल्या पावसाने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावल्याने मंदिरात आलेले कृष्णा नदीचे ओसरलेल्या नदीच्या पाण्यात पुन्हा वाढ झाली.

भाविकांनी दिगंबरा दिगंबराच्या व श्री गुरुदेव दत्तच्या गजरात दक्षिणद्वार सोहळ्यात स्नानाचा लाभ घेतला. दक्षिणद्वार सोहळ्याची माहिती झाल्याने सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी, मिरज इत्यादी ठिकाणाहून भाविकांनी स्नान व दर्शनासाठी हजेरी लावली. भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री नृसिंह सरस्वती स्वामी दत्त देव संस्थानमार्फत अधिक सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान, श्रींची उत्सव मूर्ती दर्शनासाठी श्री नारायण स्वामी यांचे मंदिरात ठेवण्यात आली आहे. नृसिंहवाडी व औरवाड यांना जोडणारा जुना पूल पाण्याखाली गेला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.