Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक

गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या तरुणाला अटक







सांगली : खरा पंचनामा

शहरातील काळीवाट परिसरात गांजा विक्रीच्या तयारीने फिरणाऱ्या तरूणास सांगली शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 4 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

नहीम मेहबुब कागजी (वय २५, रा. कत्तलखान्याजवळ, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. शहरासह जिल्ह्यात गांजा तसेच नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिले आहेत. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभिजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली खास पथके तयार करण्यात आली आहेत. 

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शहरात गस्तीवर होते. संशयित कागजी हा आकाशवाणी ते काळीवाट रस्त्यावर थांबला आहे. त्याच्याजवळ गांजा असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यांनी सापळा रचून त्याला अटक केली.

शहरचे निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे, गुंडोपंत दोरकर, झाकीरहुसेन काझी, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.