सांगली शहर पोलिस ठाण्याच्या स्टेशन डायरीत तत्कालीन डीवायएसपी डॉ. दीपाली काळे यांना वाचवण्यासाठी केली खाडाखोड
अनिकेत कोथळे खून प्रकरण : बचाव पक्षाचे वकील विकास पाटील-शिरगावकर यांचा सरकार पक्षवर सनसनाटी आरोप
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहर पोलिस ठाण्यात कोठडीत असताना अनिकेत कोथळे याचा खून केल्याच्या प्रकरणाची सोमवारी सुनावणी झाली. यावेळी तत्कालीन सीआयडीचे तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांची बचाव पक्षाचे वकील विकास पाटील-शिरगावकर यांनी उलट तपासणी घेतली. यामध्ये त्यांनी पोलिस ठाण्याच्या डायरीत तत्कालीन पोलिस उपअधीक्षक दीपाली काळे यांना वाचवण्यासाठी खाडाखोड केल्याचा मुद्दा शिरगावकर यांनी न्यायालयासमोर आणला व तो शाबित करून घेतला.
साक्ष नोंदविताना टायपिंगच्या झालेल्या चुका, योग्य ते बदल करण्याची विनंतीही शिरगावकर यांनी न्यायालयाला केली व त्यानुसार ते बदल करण्यात आल्याची माहिती ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांनी दिली. अनिकेत कोथळे खून प्रकरणात सोमवारी बचाव पक्षाचे वकील ॲड. विकास पाटील-शिरगावकर यांनी तत्कालीन तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांची सोमवारी पुन्हा उलट तपासणी घेतली, यावेळी त्यांनी कुलकर्णी यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
गुन्ह्यात वापरलेली पोलिस गाडी मुख्यालयात जमा केल्याची नोंद सांगली शहर पोलिस ठाण्याच्या डायरीत केली असताना मात्र तत्कालीन उपअधीक्षक दीपाली काळे यांना वाचवण्यासाठी त्या डायरीत वाहनाच्या चाव्या स्वत:कडे ठेवल्या या वाक्यात खाडाखोड केली आहे असा ॲड. शिरगावकर यांनी कुलकर्णी यांना प्रश्न केला, शिवाय ती गाडी पोलिस मुख्यालयात जमा केल्याची नोंद असलेली कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत, असे ॲड. शिरगावकर यांनी सांगीतले.
या खून प्रकरणातील संशयितांनी ती बेकर गाडी सांगली शहरात फिरल्या बाबत काय चौकशी केली अशीही विचारणा तपास अधिकारी कुलकर्णी यांना विचारण्यात आला, यावर त्यांनी त्यांचे सहकारी यांनी सीसीटिव्हीचा तपास केला असे उत्तर दिले, सदरचे वाहन सांगली शहर, अंकली चेक नाका, आयर्विन पूल या ठिकाणी फिरले असे सासीटिव्ही फुटेज दोषारोप पत्रामध्ये समाविष्ट नाही, हा मुद्दा समोर आणला आहे.
माहितीच्या अधिकारान्वये आरोपीस माहीती देऊ नका असे विश्रामबाग पोलीस ठाण्यात तपास अधिकारी मुकुंद कुलकर्णी यांनी सहीनिशी दिलेले लेखी पत्रच बचाव पक्षाने न्यायालय समोर आणले. ते पत्र हे दोषारोपपत्र व पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सुमारे ४ महिन्यानंतर देण्यात आले असून, सरकार पक्षाच्या विरूध्दचा पुरावा बचाव पक्षाकडून समोर येऊ नये असा मुद्दा बचाव पक्षाने समोर आणला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.