Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

शरद पवारांच्या समर्थनार्थ सांगलीचे बाप-बेटे मैदानात!

शरद पवारांच्या समर्थनार्थ सांगलीचे बाप-बेटे मैदानात!कराड : खरा पंचनामा

रविवारी दुपारी राष्ट्रवादीमधून बाहेर पडत अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. या गटातील नऊ आमदार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाले. अजित पवार यांच्यांसोबत जाणाऱ्या आमदारांची संख्या ४० पेक्षा जास्त असल्याचा दावा केला जात आहे. दुसरीकडे शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहे. त्यांनी स्वत: सर्वच आमदारांना फोन करुन त्यांच्यांशी चर्चा केली आहे. पुन्हा आपण जनतेच्या न्यायालयात जाणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले आहे. 

दोन पवारांमधील या वॉरमध्ये एक सांगलीतील बाप-बेटा जोडी चर्चेत आली आहे. अर्थात ही जोडी शरद पवार यांच्या पाठीमागे ठामपणे उभी आहे. सांगलीची ही जोडी त्यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरली आहे.

राज्यात रविवारी झालेल्या अभूतपूर्व राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार सोमवारी कराडमध्ये दाखल झाले. या ठिकाणी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाला भेट देत शक्तीप्रदर्शन केले. पक्षाच्या या संघर्षाच्या काळात पक्षासाठी बाप-बेटे मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे. एक जण मुंबईतून मैदानात होता तर दुसरा जण कराडमध्ये शरद पवार यांच्यासोबत होता. ही जोडी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अन् त्यांचे सुपुत्र प्रतीक पाटील.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील रविवारी घडलेल्या घडामोडीनंतर मुंबईत आहेत. ते मुंबई येथे थांबून ते सर्व गोष्टींवर बारीक लक्ष ठेवत आहेत. मुंबईतून राजकीय व्यूहरचना ते करत आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करत आहेत. त्यावेळी त्यांचे सुपुत्र प्रतीक पाटील हे शरद पवार यांच्या समर्थनार्थ कराडमध्ये दाखल झाले आहेत. 

शरद पवार यांच्यासह कराड येथे आमदार रोहित पवार, आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारीही उपस्थित आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.