भरलेली रेल्वे उडवून देण्याची धमकी!
सांगली, मिरज स्थानकावर तगडा बंदोबस्त
सांगली : खरा पंचनामा
संपूर्ण भरलेली रेल्वे उडवून देण्याची धमकी अज्ञाताने फोनवरून दिली आहे. त्यानंतर सर्वच रेल्वे स्थानकांवर रेल्वे पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. धमकी देणाऱ्याचा मोबाईल क्रमांक मिळाला असून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान या धमकीच्या पार्श्वभूमीवर मिरज जंक्शन, सांगली स्थानकावर रेल्वे पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रवाशांसह संपूर्ण स्थानकाची कसून तपासणी सुरू आहे.
गुरुवारी रात्री अज्ञाताने कांजूर रेल्वे स्थानकात फोन केला होता. त्यावेळी त्याने "कल 9 बाजे की योजना है, पुरा ट्रेन पॅक होगा. इंशाल्लाह हम हमारे मनसुबे मुकम्मल होंगे." खुदा हाफिज. असे सांगितले. हा फोन आल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत सर्वच रेल्वे स्थानकावर बंदोबस्तात वाढ करण्याची तसेच संशयास्पद प्रवाशी, ठिकाणे यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच नाईट ड्यूटी केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच सुट्टीवर असलेल्या सर्वांना तातडीने बोलावून घेण्यात आले आहे. मिरज जंक्शन आणि सांगली स्थानकांसह जिल्ह्यातील सर्वच स्थानकांवर रेल्वे पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून श्वान पथकाद्वारे तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान सागर मारुती मोलावडे नावाच्या व्यक्तीने ही धमकी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या मोबाईल क्रमांकवरून त्याच्या नावाचा शोध लागला आहे. तो उत्तर गोवा येथे असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांचे पथक त्याच्या शोधासाठी गोव्याला पाठवण्यात आले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.