Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीत दुचाकी चोरट्यास अटक

सांगलीत दुचाकी चोरट्यास अटक



सांगली : खरा पंचनामा

सांगली शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या चोरट्यास सांगली शहर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून ३५ हजार रुपयाच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

जावेद रफिक जानकर (वय २५, रा. पन्नास फुटी रस्ता, रज्जाक गॅरेजच्या पाठीमागे, शामरावनगर ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील कर्मचाऱ्यांना संशयीत चोरट्याविषयी माहिती मिळाली होती. सांगलीतून चोरलेली दुचाकी विक्रीकरिता चोरटा बागलकोट जिल्ह्यातील रबकवी - बनहट्टी येथील महालिंगपूर येथील बसस्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. तेथे पोलिसांनी सापळा रचला. तेथे एक तरुण संशयास्पदरित्या फिरताना आढळल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. 

मात्र नंतर त्याने त्याच्याकडे असलेली दुचाकी त्याने दि. ८ रोजी शंभर फुटी रस्ता परिसरातील भोसले प्लॉट येथून चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली. जावेद जानकर कडून पोलिसांनी अन्य एक चोरीची दुचाकी जप्त केली आहे.

पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक महादेव पवार, श्रीपाद शिंदे, संदिप कुंभार, गुंडोपंत दोरकर, झाकीरहुसेन काझी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.