Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्र तोडण्याचा डाव! गुजरातने केले अतिक्रमण : आमदारांचा खळबळजनक आरोप

महाराष्ट्र तोडण्याचा डाव! गुजरातने केले अतिक्रमण : आमदारांचा खळबळजनक आरोप



मुंबई : खरा पंचनामा

महाराष्ट्र राज्यातील डहाणू आणि तलासरी या सीमेवर हा वाद निर्माण झालेला आहे. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील सीमेवर वेवजी, गिरगाव, हिमानिया, झाई, सांभा, आच्छाड या आपल्या महाराष्ट्र राज्यातील ग्रामपंचायती आहेत.

मात्र, या गावातील जमिनीवर शेजारच्या गुजरात राज्याने अतिक्रमण केले आहे. यामुळे त्या गावांमध्ये आणि त्या राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा वाद वेळीच मिटवला नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा विधानसभेत आमदार विनोद निकोल यांनी दिला.

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमाभागाचा प्रश्न अदयाप प्रलंबित आहे. त्यातच आता शेजारच्या गुजरात राज्याने महाराष्ट्रात हातपाय पसरायला सुरवात केली आहे असा आरोप आमदार निकोल यांनी केला. गुजरात राज्यातील उमरगाव गोवाडे, सूलसुंभा, सध्या, उमरगाव तालुक्यातील सूलसुंभा ग्रामपंचायतीने आपल्या महाराष्ट्र राज्यातील वेवजी ग्रामपंचायतमध्ये जवळ जवळ ५०० मीटर जागेवर अतिक्रमण केले आहे अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.