Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'अजित' उत्सव सप्ताह होणार साजरा!

'अजित' उत्सव सप्ताह होणार साजरा!मुंबई : खरा पंचनामा 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित उत्सव सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.

अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं की, अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असून राष्ट्रवादीच्या वतीनं अजित उत्सव नावाने सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, पेरण्या झालेल्या नाहीत, त्यामुळं प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

राजकारणाची सुरुवात समाजकारण, सहकार, कला, क्रीडा, लोकसभा सदस्य, राज्यमंत्री, बँकेचे अध्यक्ष, विधानसभा सदस्य, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असा प्रवास अजित पवार यांनी केला. त्यांनी नेहमीच विकासाला अधिक महत्त्व दिलं. तसेच वेळ पाळत सर्वांना न्याय दिल्याचं तटकरे यांनी नमूद केलं.

अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा हा स्थायीभाव असून काहींना तो आवडत नसेल तरी महाराष्ट्राला तो रुचला आहे. रक्तदान शिबिर, पावसाळ्यामुळे छत्र्या वाटप, वृक्ष लागवड, शालेय साहित्य, स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान, ग्राम स्वच्छता असे सामाजिक उपक्रम २२ ते ३१ दरम्यान राबवणार असल्याचं तटकरे यांनी म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.