Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्याला अटक

नोकरीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्याला अटक



सांगली : खरा पंचनामा

शासनाच्या पोस्ट खात्यासह अन्य विविध विभागांत नोकरीच्या आमिषाने ३२ लाखांचा गंडा घालण्याऱ्या संशयितास विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध आणखी काही तक्रारी दाखल होत आहेत, असे विश्रामबागचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगितले.

वैभव अण्णासाहेब बंडगर (मालगाव रस्ता, आवटी पेट्रोलपंपानजीक, मिरज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फिर्यादी अतुल ओमासे हे शहरातील एका खासगी कंपनीत सुरक्षारक्षकाचे काम करत आहेत. संशयित वैभव बंडगर याची कवलापूर येथे अक्षरदीप फाउंडेशन ट्रस्ट, तसेच अक्षरदीप शिक्षण संस्था आहे. या माध्यमातून त्याने परिचयातील अनेकांना, त्याच्या वरिष्ठ पातळीवर ओळखी असून शासकीय पदांवर नोकरी लावण्याचे आमिष दाखवले.

त्यानंतर फिर्यादीसह आठ जणांनी संशयित वैभव बंडगर यास वेळोवेळी ३२ लाख रुपये दिले. हा फसवणुकीचा प्रकार मार्च ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीत विश्रामबाग परिसरात घडला. संशय येऊ नये, याकरिता संशयित वैभव बंडगरने, ज्यांनी पोस्ट विभागात नोकरीसाठी पैसे दिले होते, त्यांना पोस्ट खात्याची बनावट नियुक्तिपत्रे दिली. त्याच्यावर डिजिटल शिक्का व बनावट स्वाक्षरी करण्यात आली होती. कालांतराने कोणत्याच आस्थापनेतून नोकरीकरिता बोलावणे न आल्याने यामध्ये फसवणूक झाल्याचे संबंधितांच्या लक्षात आले. त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईमुळे फसवणूक झालेल्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. प्रथम दर्शनी कोट्यवधींचा घोटाळा असल्याचे समोर आले. लवकरच आणखी काही तक्रारी वाढण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.