Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रवीण बाबर कारागृहातून ताब्यात! नालसाब मुल्ला खून प्रकरण

रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रवीण बाबर कारागृहातून ताब्यात!
नालसाब मुल्ला खून प्रकरण



सांगली : खरा पंचनामा

राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, रेकॉर्डवरील गुन्हेगार नालसाब मुल्लाच्या खुनाच्या कटातील आणखी एका सूत्रधाराला कारागृहातून ताब्यात घेण्यात आले आहे. सांगली पोलिसांनी ही कारवाई केली.

रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि मोका अंतर्गत कारागृहात असणारा प्रवीण बाबर (वय २८, रा. साई मंदिरजवळ, शंभरफुटी) असे त्याचे नाव आहे. मुख्य सूत्रधार सचिन डोंगरेसह तो ‘मोका’अंतर्गत गुन्ह्यात कारागृहात होता. तेथून त्याने हल्लेखोरांना दुचाकी पुरवण्यासह अन्य मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानंतर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करत त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

नालसाब मुल्ला खून प्रकरणी पोलिसांकडून मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे याची चौकशी सुरू आहे. मुल्ला याच्यावर चौघांनी गोळीबार करत त्याचा निर्घृण खून केला होता. या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे हा मोकाअंतर्गत कळंबा कारागृहात होता. तेथूनच त्याने कट रचल्याची कबुली हल्लेखोरांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी डोंगरे याला अटक केली. डोंगरे आणि संशयितांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता हल्लेखोरांनी खुनापूर्वी दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी फायरिंगचे प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती दिली. 

सुत्रधार डोंगरे यांची चौकशी केली असताना त्याचा साथीदार प्रवीण बाबर याचाही कटात सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले. प्रवीण बाबर याने हल्लेखोरांना दुचाकीसह अन्य मदत मदत केल्याचे समोर आले.

शंभरफुटी रस्त्यावरील ‘जॉय ग्रुप’ या टोळीतील ११ जणांना मोका लावण्यात आला होता. म्होरक्या सचिन डोंगरेसह प्रवीण बाबर याचाही त्यात समावेश होता. २०१९ पासून तो कळंबा कारागृहात होता.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.